Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued regarding implementation of Revised In-Service Assured Progression Scheme with 2 benefits after 12/24 years of regular service ] : 12 / 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 02 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , मा.उच्च न्यायालय , मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्र.1861/2025 महाराष्ट्र राज्य अनुदानित आश्रमशाळा वसतीगृहे व इतर यांनी दाखल केले असून सदर प्रकरणी मा.न्यायालयाने दि.10.12.2025 रोजीच्या निर्णयानुसार अपीलार्थींना सुधारित आश्वासित प्रगती योजना अंतर्गत लाभ देणेबाबत आदेशित करण्यात आले आहेत .
यानुसार आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थाद्वारा संचलित अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 02 लाभांची सुधारित सेवांर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
तसेच मा.मंत्रीमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरुन शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थाद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांना प्राथमिक , उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दोन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी पासुन लागु करण्यास याद्वारे मंजूरी देण्यात येत आहे .
तसेच सदर योजना पुर्वीलक्षी प्रभावाने लागु राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत . तसेच कोणत्याही प्रकारची थकबाकी देय होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत .


- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026
- वाहतुक भत्ता ( TA ) शहरी व ग्रामीण भाग करीता सरसकट देणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित !
- शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय ..