Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Major government decision issued through the Finance Department regarding state government employees on 26.05.2026 ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 26 मे 2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासनाने कर्मचाऱ्यांना स्वग्राम सवलत उपभोगण्याची संधी संपुर्ण सेवा कालावधीत प्राप्त होत रहावी या दृष्टीकोनातुन स्वग्राम घोषित करण्याबाबतची तरतुद करण्यात आलेली आहे .
यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्याने शासन सेवेत प्रथम प्रवेश केलेल्या दिनांकापासून सहा महिन्यात स्वग्राम घोषित करणे बंधनकारक / अनिवार्य असणार आहे . याबाबतच्या सुचनांचा समावेश नवनियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशातच नियुक्ती अधिकाऱ्याने करण्याचे निर्देश देण्यात आली आहे .
तसेच स्वग्राम बदलण्याची संधी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांस संपुर्ण शासन सेवा कालवधीत एकदाच अनुज्ञेय असणार आहे . तसेच ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी यापुर्वी प्रथम नियुक्ती दिनांकापासुन 06 महिन्यांच्या आता स्वग्राम घोषित केले असून , सहा महिन्यानंतर विवाह अथवा अन्य प्रयोजन मुळे प्रथम घोषित केले असून , सहा महिन्यानंतर विवाह वा अन्य प्रयोजन मुळे प्रथम घोषित केलेल्या स्वग्रामात बदल केला असल्यास , अशा कर्मचाऱ्यांनाही सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून पुढील …
सेवा कालावधीत स्वग्राम बदल करण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध असणार आहे . तसेच विहीत कालमर्यादा नंतर स्वग्राम घोषित केलेल्या अविवाहीत महिला / विवाहीत महिलांना , विवाह / घटस्फोट / वैध्यव्य / परित्यक्ता / पुनर्विवाह या घटना प्रसंगास अनुसरुन स्वग्राम बदल झाला असल्यास , सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 06 महिन्यांच्या आत स्वग्राम बदल करणे बंधनकारक असणार आहे .
तसेच अविवाहीत महिला / विवाहीत महिलांना सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या नंतर विवाह / घटस्फोट / वैध्यव्य / परित्यक्ता / पुनर्विवाह या घटना प्रसंगास अनुसरुन स्वग्राम बदल झाल्यास , सदर घटनेच्या दिनांकापासुन 06 महिन्यांच्या आत स्वग्राम बदल करणे बंधनकारक असणार आहे .


- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.02.06.2026 रोजी घेण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण GR..
- दिनांक 2 जून 2026 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 04 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- राज्यातील सर्वच सरकारी / निमसरकारी (ZP) कर्मचारी , पेन्शन धारकांना 60% दराने DA वाढ कधी ?
- आठवा वेतन आयोगामध्ये कर्मचारी , पेन्शनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली संदर्भात मोठा कॅबिनेट निर्णय दि.26.05.2026