Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding the implementation of revised Transport Allowance (TA) to State Employees, GR issued on 26.09.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतुक भत्ता लागु करणेबाबत , राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांचे वित्त विभागाच्या दिनांक 20.04.2022 रोजीच्या निर्णयाच्या तक्ता क्र.01 व 02 मध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ताचे दर हे दिनांक 01 एप्रिल 2022 पासुन सुधारित करण्यात आले आहेत .
वित्त विभागाच्या दिनांक 20.04.2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कर्तव्य स्थानापासुन 01 कि.मी अंतराच्या आत तसेच कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात सरकारी निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ता अनुज्ञेय असणार नाही , अशा प्रकारची तरतुद करण्यात आलेली आहे .
परंतु केंद्र सरकारच्या दिनांक 15.09.2022 रोजीच्या ज्ञापनानुसार , केंद्र सरकारच्या पात्र दिव्यांग कर्मचारी यांना कर्तव्यस्थानापासुन 01 कि.मी अंतराच्या आत सरकारी / खाजगी निवासस्थानात राहत असेल अथवा कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात सरकारी निवास स्थानात वास्तव्यास असेल ..
तरीही त्यांना सर्वसाधारण दराच्या दुप्पट दराने वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील अशा प्रकारची तरतुद करण्यात आलेली आहे . यानुसार राज्य सरकारच्या सदर तरतुदी अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ( कर्तव्यस्थानापासुन 01 कि.मी अंतरावर वास्तव्य करणाऱ्या ) दिनांक 20.04.2022 रोजीच्या निर्णयातील वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील अशी तरतुद करण्यात आलेली आहे .


- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026