Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ new pay scale shasan nirnay] : विधी व न्याय विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार काही पदांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यासंदर्भात दिनांक चार मे 2026 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेली आहेत .
01. माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठे येथे विधि लिपिकांची नियुक्तीची योजना 2024 या योजना अंतर्गत जुडिशियल रिसर्च असिस्टंट ( यापूर्वीचे पदनाम विधी लिपिक ) यांना देण्यात येणाऱ्या वृत्ती वेतनाची एकत्रित रक्कम दरमहा 65,000/- रुपये वरून …80,000/- रुपये वाढवण्यास एक विशेष बाब म्हणून शासन मान्यता देण्यात येत आहे .
02. माननीय उच्च न्यायालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायमूर्तीच्या निवासी कार्यालयाकरिता प्रत्येकी 01 याप्रमाणे न्यायमूर्तीच्या मंजूर पदापैकी कार्यरत न्यायमूर्तीच्या संख्ये एवढ्या “स्वयंपाकी” पदाच्या सेवा एक वर्ष कालावधी करिता 25,000/- रुपये प्रति महा ऐवजी ते वाढवून 40,000/- रुपये प्रतिमहा इतक्या पारिश्रमिकावर घेण्यास एक विशेष बाब म्हणून शासन मंजुरी प्रदान करण्यात आली आहे .
त्याचबरोबर सदरहू स्वयंपाकी पदाच्या सेवा माननीय मुख्य न्यायमूर्तीच्या निर्णयानुसार बाह्य स्त्रोताद्वारे अथवा आंतस्त्रोताद्वारे घेण्याबाबत एक विशेष बाब म्हणून मान्यता देण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे .


- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026