Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ With the cancellation of questions in the TET exam, teachers who pass the exam on the border will get additional marks. ] : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये प्रश्न चुकीचा असल्याने , सदर प्रश्न रद्द करण्याचे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले असून , यामुळे काठावर पास शिक्षकांवान वाढीव गुण मिळणार आहेत .
दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा ( MAHATET ) 2025 पेपर 1 ( इयत्ता 1 ली ते 5 वी करीता ) पेपर 2 ( इयत्ता 6 वी ते 8 वी करीता ) चा अंतरित निकाल परिषदेच्या अधिकृत्त संकेतस्थळावर दिनांक 16.02.2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता ..
व सदर अंतरिम निकालावर दिनांक 16.01.2026 ते दि.21.01.2026 पर्यंत गुणपडताळणी व आक्षेप मागविण्यात आलेले होते . यानुसार दिनांक 16.01.2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतरिम निकालावरील प्राप्त हरकतीनुसार पेपर – 1 मधील परिसर अभ्यास …
विषयातील प्रश्न क्रमांक संच A -147 , संच B -142 , संच C – 137 , संच D – 132 बाबत आक्षेप प्राप्त झाल्याने तज्ञ / समिक्षकांच्या अभिप्रायानुसार सदरचा प्रश्न हा रद्द करण्यात येत आहेत . व त्यानुसार अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे . याची परिक्षार्थी शिक्षकांनी नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !