राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.11.03.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 08 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 08 major Government Decisions (GR) issued on 11.03.2026 regarding State Officers/Employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 11.03.2026 रोजी 08 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.गृह विभाग : पोलिस विभागाच्या विविध आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत गृह विभाग अंतर्गत मंजूरी देण्यात आलेली आहे .यानुसार राज्यातील 11 पोलिस प्रशिक्षण विद्यालय तसेच गुप्तवार्ता घटकातील एकुण 1025 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात येत आहे .

02.शालेय शिक्षण विभाग : महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब ( प्रशासन शाखा ) मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गातील अधिकाऱ्याच्या पदस्थापनेत अशंत : बदल करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .

03.ग्राम विकास विभाग : ग्राम विकास विभाग अंतर्गत आस्थापनेवरील अस्थायी पदे सन 2026-27 मध्ये पुढे चालु ठेवणेबाबत मंजूरी देण्यात येत आहे .

04.महसुल व वन विभाग : राज्यांमध्ये एकुण 11 अपर जिल्हाधिकारी पदे निर्मितीस मान्यता देण्यात येत आहे .

05.सार्वजनिक आरोग्य विभाग : आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील अधिकाऱ्यांच्या वयांच्या 50/55 व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत दि.11.03.2025 रोजी मंजूरी देण्यात येत आहे .

06.विधी व न्याय विभाग : न्यायिक अधिकारी संस्था नागपुर  या संस्थेच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात येत आहे .

07.विधी व न्याय विभाग : शासकीय कर्मचारी इ. कर्जे या उपशीर्ष अंतर्गत मोटारवाहन खरेदी अग्रिमे , नविन मोटार सायकल / स्कुटर खरेदी अग्रिम वाटप करीता निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे .

08.विधी व न्याय विभाग : राज्यातील कौटुंबिक न्यायालयांतील एकुण 397 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात येत आहे .

या संदर्भातील वरील 08 शासन निर्णय (GR) डाउनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment