Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Deadline for state employees till 31.03.2026 ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 28.03.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , पेन्शन विकल्प सादर करण्यास दिनांक 31.03.2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे .
सदर शासन निर्णयानुसार NPS प्रणाली लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनांने लागु केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना या पैकी एकाची ..
निवड करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे . सदरचा विकल्प हा आपल्या कार्यालय प्रमुख यांच्याकडे भरुन सादर करायचा आहे . जर दिनांक 31.03.2026 पर्यंत विकल्प सादर न केल्यास ..
सदर कर्मचारी हा राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) हीच पेन्शन योजना कायम लागु असेल . यामुळे ज्यांना सुधारित राष्ट्र्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजनांमध्ये स्विच करायचे आहेत .
अशा कर्मचाऱ्यांनी दिनांक 31.03.2026 पर्यंत आपला पेन्शन विकल्प सादर करायचा आहे . कारण ही अंतिम मुदतवाढ असणार आहे .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026