राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मे देय जुन 2026 वेतन अपडेट GR निर्गमित दि.23.04.2026

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ State Employees’ Monthly May June 2026 Salary Update GR Issued on 23.04.2026 ] : सेवार्थ प्रणालीतील अधिकारी / कर्मचारी यांची ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.23.04.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

वित्त विभागाच्या दि.27.03.2026 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयक अगोदर ई-केवायसी पुर्ण करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत .

तसेच अद्यापी काही प्रशासकीय विभाग मार्फत सदरची कार्यवाही पुर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी माहे मे 2026 देय जुन 2026 वेतन देयका अगोदर ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे .

मात्र यापुढे अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभिर्याने नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच सदरची मुदतवाढ ही सर्व जिल्हा परिषदा , मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा , शालेय शिक्षण विभाग , इ. यांना देखिल लागु असणार आहेत .

Leave a Comment