राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांना उर्वरित थकीत DA व केंद्राप्रमाणे 60% DA कधी ?

Spread the love

Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai bhatta update latest news ] : राज्य कर्मचारी/ पेन्शन धारकांना महागाई भत्ता फरक व केंद्राप्रमाणे DA वाढ कधी मिळणार या संदर्भात सविस्तर वृत्त खालील प्रमाणे पाहुयात ..

महागाई भत्ता थकबाकी : दिनांक एक जुलै 2025 राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे . परंतु केवळ जुलै ते ऑक्टोबर अशा चार महिन्याची महागाई भत्ता थकबाकी अदा करण्यात आलेली आहे .

तर उर्वरित नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या 03 महिने कालावधी मधील DA थकबाकी संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार आहे . पुढील DA वाढीच्या घोषणा पूर्वी सदर DA फरक बाबत राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

केंद्र सरकार प्रमाणे 60% DA वाढीची घोषणा : केंद्र सरकार प्रमाणे दिनांक 01 जानेवारी 2026 पासून 58% वरून 60 टक्के महागाई भत्ता वाढीकरिता राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे .

यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार तसेच पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे ..

Leave a Comment