Mh-tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ janaganana work update paripatrak ] : जनगणना कामकाज संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पालिका प्रशासनाचे आयुक्त यांच्या प्रति , दिव्यांग सक्षमीकरण विभाग मार्फत महत्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आले आहे .
सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आली आहे की , महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटना यांचे दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी निवेदनानुसार , शासनामार्फत जनगणना कार्यवाही सुरू असताना , महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 27 सप्टेंबर 2010 रोजीच्या निर्णयानुसार , दिव्यांग कर्मचारी / अधिकाऱ्यांना जनगणनेची कामे देऊ नयेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग व्यक्तींना भेदभाव मुक्त व सन्मानपूर्वक वागणूक देणे ही शासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे .
तथापि काही ठिकाणी या निर्देशाचे पूर्ण पालन होत नसल्याच्या तक्रारी अधून – मधून प्राप्त होतात , त्यामुळे दिव्यांग कर्मचारी अधिकाऱ्यांना अनावश्यक त्रास होण्याची शक्यता निर्माण होत आहे . त्या अनुषंगाने सदर परिपत्रकाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ..
दिव्यांग कर्मचारी / अधिकाऱ्याला जनगणनेची कामे देण्यात येऊ नयेत व शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी होईल व केलेल्या कार्यवाहीची एक प्रत संघटनेस अवगत करावी , ही विनंती करण्यात आली आहे .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026