दि.14 मे रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत घेण्यात आले 04 मोठे कॅबिनेट निर्णय !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ In the cabinet meeting held on May 14, 04 major cabinet decisions were taken regarding state employees. ] : दि.14 मे रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत 04 मोठे कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत .

01.मृदा व जलसंधारण विभाग : मृदा व जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे , यानुसार राज्यातील सुमारे 8,767 पदांना मान्यता देण्यात आली असून विभागाकरिता 6,481 व महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकरिता 2 पदांसह 6,483 पदांव्यतिरिक्त सुमारे 2,284 वाढीव पदे , विभागाच्या क्षेत्रिय यंत्रणेची फेररचना होणार आहे .

02.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : अनुसुचित जाती आयोगासाठी उपाध्यक्ष पदाची निर्मिती करण्यात आली आहे , यानुसार संबंधित महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती आयोग अधिनियम 2025 मध्ये सुधारण करण्यात येणार आहे .

03.आदिवासी विकास विभाग : महाराष्ट्र राज्य अनुसुचित जमाती आयोगात प्रभावी समन्वय व प्रशासकीय सोयी साठी उपाध्यक्षपद निर्माण करण्यात मंजूरी देण्यात आली आहे .

04.इतर मागास बहुजन कल्याण विभाग : विभाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील शिक्षकांना 12 व 24 वर्षाच्या नियमित सेवे नंतर चटोपाध्याय आयोग नुसार वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

सदर आश्रमशाळांतील 788 शिक्षकांना ही वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .त्याचबरोबर सदरचा लाभ हा पुर्वलक्षी प्रभावाने लागु राहणार नाही तसेच यांमध्ये कोणतीही  थकबागी दिली जाणार नाही .

Leave a Comment