Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR for determining the proportion of non-teaching staff recruitment in state-recognized private partially/fully aided schools ] : राज्यातील मान्यता प्राप्त तसेच खाजगी अंशत : / पुर्णत : अनुदानित माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 04 एप्रिल 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
वरील नमुद शाळांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकरीता सुधारित आकृतीबंध लागु करण्या आलेला आहे . सदर पदभरती ही विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
शिक्षकेत्तर कर्मचारी पदांचे नावे : यांमध्ये कनिष्ठ लिपिक , वरिष्ठ लिपिक , मुख्य लिपिक , पूर्णवेळ लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक अशा एकुण 05 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पदे भरले जाणार आहेत .
यांमध्ये कनिष्ठ लिपिक या पदावरील नियुक्ती करीता पदोन्नतीने व व अनुकंपा तत्वासह नामनिर्देशनाने 50:50 अशा प्रमाणात निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहेत . तसेच अनुकंपा नियुक्तीसह 100 टक्के पदे हे भरण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर वेतनासाठी निधीचे वितरण ; GR निर्गमित दि.26.09.2025
तसेच चतुर्थश्रेणी या पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत असणारे कर्मचारी हे अद्यापही कार्यरत असण्याची शक्यता असून , त्यापैकी काही कर्मचारी हे वरील पदावर पदोन्नतीने नियुक्त होणेकरीता आवश्यक पात्रता धारण करत असल्याची देखिल शक्यता असून , अशा स्थितीमध्ये प्रचलित पद्धतीनुसार सदरची पदे हे 50 टक्के मर्यादेत पदोन्नतीने भरणे आवश्यक असेल .
याबाबतचा सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ….
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !