Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 6 consecutive days of public holiday declared for government employees from today ] : सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्त सलग 06 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे .
आज दिनांक 19.10.2025 रोजी रविवार निमित्त सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे . तर दि.20 ते 22 ऑक्टोंबर पर्यंत दिवाळी सुट्टी निमित्त कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल , तर दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी भाऊबीज निमित्त सरकारने सुट्टी जाहीर केली आहे .
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 18 ऑक्टोंबर पासुन ते दिनांक 23 ऑक्टोंबर पर्यंत सलग 06 दिवस सुट्टी मिळणार आहे . तर पुढे दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी शुक्रवार येत असून , त्या दिवशी सुट्टी एक दिवसाची सुट्टी घेतल्यास , पुढे शनिवार , रविवार येत आहे .
यामुळे अजुन 03 दिवसांची सुट्टी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे . बऱ्याच सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी सुट्टी देखिल घेतलेली आहे .
यामुळे दिनांक 27 ऑक्टोंबर पासुन नियमित सरकारी कार्यालये सुरु राहतील . दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी चौथा शनिवार असल्याने बँकांना देखिल सुट्टी असणार आहे .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026