Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government Holiday Declared on April 23rd; Government Resolution (GR) Issued on April 17, 2026. ] : दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी शासकीय सुट्टी जाहीर करणेबाबत , उद्योग उर्जा व कामगार व खनिकर्म विभाग मार्फत दि.17.04.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , भारत निवडणुक आयोगाने निर्गमित केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार , दि.23.04.2026 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या 223 राहुरी व 201 – बारामती या 02 विधानसभा मतदार संघातील पोट निवडणूक 2026 घेतली जाणार आहे .
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असणाऱ्या कामगार / अधिकारी / कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तहीरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदरची सुट्टी ही खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखिल लागु आहे . यांमध्ये कॉर्पोरेट कंपन्या , खाजगी कंपन्या , शॉपिंग सेंटर , मॉल्स , रिटेलर्स इ. आस्थापनांना सदर नियम लागु राहणार आहे .
अवदात्मक स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होईल , अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवा ठिकाणी सुट्टी देणे शक्य नसल्यास , कामांमध्ये 2-3 तासांची विशेष सवलत देण्याची निर्देश देण्यात आले आहेत .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026