Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ On April 17, 2026, eight major/significant Government Resolutions were issued regarding State officers and employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.17.04.2026 रोजी 08 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.सामान्य प्रशासन विभाग : स्वीय सहाय्यक व निवडश्रेणी लघूलेखक यांना संबंधित पदावरील पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातुन सुट देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
02.गृह विभाग : अपर पोलिस महासंचालक व संचालक , दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन , महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवारी राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/55 व्या वर्षापलीकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षाच्या नंतर सेवा पुनर्विलोकन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.गृह विभाग : नक्षलग्रस्त गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील विशेष अभियान पथक मधील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहनपर C- 60 सेवा पदक घोषित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.सार्वजनिक आरोग्य विभाग : उपसंचालक , आरोग्य सेवा मंडळ ठाणे व पुणे यांच्या अधिपत्याखालील ग्रामीण रुग्णालये / उपजिल्हा / जिल्हा रुग्णालय / सामान्य रुग्णालयातील दंतचिकित्सा विभागातील अस्थायी पदे पुढे चालु ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
05.सार्वजनिक आरोग्य विभाग : राज्यातील 350 तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील 1050 अस्थायी पदे पुढे चालु ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
06.विधी व न्याय विभाग : शासकीय कर्मचारी इ. कर्जे , वाहन खरेदी अग्रिम , मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप . इ . करीता निधी वितरण करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
07.सामान्य प्रशासन विभाग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण , बेलापुर , नवी मुंबई या कार्यालयातील कक्ष अधिकारी / विशेष अधिक्षक ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
08.कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग : कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील सहायक आयुक्त या संवर्गातून उप आयुक्त या संवर्गात पदोन्नती देण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
वरील नमुद सर्व शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026