Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution regarding the granting of transfer leave to teachers who participated in Census duties. ] : जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा मिळणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.29.10.2010 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , जनगणेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक , कर्मचाऱ्यांना बदली रजा मंजूर करणे संदर्भात खलीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे .
उन्हाळी सुट्टीत ज्या शिक्षकांनी जनगणेचे काम करतील त्यांच्या अर्जित रजेच्या खात्यात त्यांनी जेवढे दिवस काम केले असेल , तेवढे दिवसांची रजा जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच ज्या शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांचे शैक्षणिक वर्ष संपण्यापुर्वी बदली रजा उपभोगता आली नाही , त्यांना त्या बदली रजा 2010-11 या शैक्षणिक वर्षात नेहमीच्या अटीवर उपभोगण्यास अथवा सदरची रजा त्यांच्या अर्जित रजेच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
मात्र जनगणनेच्या कामाच्या कालावधीचे प्रमाणपत्र संबंधित प्रधान जनगणना अधिकारी अथवा जनगणना चार्ज अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतरच संबंधित शिक्षकांना सदरची रजा अनुज्ञेय होईल अशी बाब नमुद करण्यात आली आहे .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026