निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठी सुधारणा ; GR निर्गमित दि.07.04.2026

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Major Improvement in the Procedure for Granting Pension / Family Pension; Government Resolution (GR) Issued on 07.04.2026. ] : निवृत्तीवेतन / कुटंबनिवृत्तीवेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठी सुधारणा करणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.07.04.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , नामनिर्देशित वारसदाराने निवृत्तीवेतन / कुटंबनिवृत्तीवेतन धारकाच्या मृत्युच्या दिनांकापासून 05 वर्षांच्या आतमध्ये अधिदान व लेखा कार्यालय मुंबई / कोषागार कार्यालयास अर्ज सादर केल्यास हयात कालीन थकबाकी रक्कम परिगणना करुन अधिदान व लेखा कार्यालयांनी त्यांच्या स्तरावर रक्कम प्रदान करण्यास कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत .

जर वारसांने 05 वर्षानंतर अर्ज सादर केल्यास अशा प्रकरणी थकबाकीची मागणी अमान्य करुन तसे संबंधित वारसदारांना कळवण्याचे निर्देश आहेत . यापुर्वी हा कालावधी हा 01 वर्षे इतका होता यामध्ये वाढ करुन 05 वर्षे इतके करण्यात आले आहेत .

जर नामनिर्देशन केले नसल्यास , अशा प्रकरणी हयात कालीन थकबाकी रक्कम रुपये एक लाखांपेक्षा कमी असल्यास, अधिदान व लेखा कार्यालय , मुंबई / कोषागार कार्यालयाने त्यांच्या स्तरावर कागदपत्रांच्या आधारे हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

आवश्यक कागदपत्रे : वारस प्रमाणपत्र ( तहसीदार यांच्याकडील ) , कुटुंब तपशिल प्रमाणपत्र ( कार्यालय प्रमुख / आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडील ) , नामनिर्देशन / मृत्युपत्र ..

Leave a Comment