Mh-Tv@24 पवार प्रतिनिधी [ Regarding attendance of teachers and non-teaching staff, circular issued on 11.03.2026 ] : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती बाबत शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) मार्फत दिनांक 11 मार्च 2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत गेल्याच्यानंतर शालेय कामकाज सुरु होण्या अगोदरच सुरुवातीला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची हजेरीवर स्वाक्षरी होणे अनिवार्य आहे .
परंतु बऱ्याच शाळेत मुख्याध्यापक आपली मनमर्जी करुन त्या संबंधित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना हजेरीवर स्वाक्षरी करु न देता शालेय कामकाज पुर्ण झाल्याच्या नंतर स्वाक्षरी करायला स्वाक्षरी हजेरी देत असतात .
ही बाब अतिशय गंभीर व नियमबाह्य असल्याचे कळविण्यात आले असून , त्या अनुषंगाने शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी विहीत वेळेत शाळेत हजर झाल्याच्या नंतर लगेचच त्यांची हजेरी पत्रकावर घेण्याचे तसेच स्वाक्षरीच्या..
वेळी हजेरी पत्रक उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्याबाबत सर्व शाळा / उच्च माध्यमिक शाळांना कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026