Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Salaries to increase by up to 34% under the new Pay Commission. ] : नविन वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 30 ते 34 टक्के पर्यंत वाढणार आहे .या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
केंद्रीय वित्त राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले कि , दि.03.11.2025 रोजी स्थापन करण्यात आलेली नविन वेतन आयोग समिती मार्फत अहवाल तयार करुन लवकरच केंद्र सरकारकडे सादर करणार आहे .
याकरीता 18 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे , म्हणजेच माहे जुन 2027 पर्यंत सदर समिती आपला अहवाल केंद्र सरकारकडे सादर करेल . यांमध्ये समिती विविध मुद्यांवर आपल्या शिफारसी सादर करणार आहेत .
प्राप्त माहीतीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 ते 34 टक्के पर्यंत पगार वाढ होईल , याशिवाय निवृत्तीवेतनांमध्ये देखिल 34 टक्के पर्यंत पेन्शन वाढण्याची शक्यता आहे .
सध्या फिटमेंट फॅक्टर निश्चितीवर भर दिली जात आहे , कारण फिटमेंट फॅकटर शिवाय पुढील वेतनश्चिती तक्ता शक्य नाही . यामुळे सातवा वेतन आयोग प्रमाणेच आठवा वेतन आयोग 2.57 पट फिटमेंट फॅक्टरवर निश्चित केला जाण्याची मोठी शक्यता आहे .
फिटमेंट फॅक्टर निश्चितीवरच मुळ वेतन निपश्चिती केली जाते . तर त्यांनतरच सरकारी कर्मचाऱ्यांना देय होणारे भत्ते निश्चित केले जाईल .याचा थेट लाभ सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना होणार आहे .
थकबाकी मिळणार : सरकारी कर्मचा-यांना आठवा वेतन आयोग हा दि.01.01.2026 पासुन अनुज्ञेय असल्याने , सदर कालावधीपासुन थकबाकीची रक्कम अनुज्ञेय होईल .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !