दि.29 एप्रिल रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Seven major cabinet decisions were taken during the Cabinet meeting held on April 29. ] : दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय घेण्यात आले आहेत .

01.AI धोरण : महाराष्ट्र राज्याचे महत्वकांक्षी पाऊल म्हणून एआय धोरणांस मंजूरी देण्यात आली आहे , याकरीता 10 हजार कोटी पेक्षा अधिक गुंतवणुक करण्यात येणार असुन , यामुळे दीड लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत .

02.डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन : लंडन येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापनेस मंजूरी देण्यात आली आहे . याकरीता डॉक्टरेट करीता शिष्यवृत्त प्रदान केली जाणार आहे .

03.हरित महाराष्ट्र आयोग : राज्यात हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यास मंजूरी देण्यात आली आहे , यामुळे राज्यात 300 कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे .

04.हरित उर्जा : राज्यात हरित उर्जेचा वापर व पारेषण क्षमतेचे अधिक बळकटीकरण करीता मॅजेस्टिक – महाराष्ट्र ॲक्सलरेटिंग ग्रीन एनर्जी अँण्ड स्टोरेज टेक्नॉलॉजीज इंटिग्रेशन इन कनक्टेड ग्रीड योजना राबविण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

05.दिव्यांग सक्षमीकरण विभाग : दिव्यांगाच्या शिक्षणाला बळ देण्याकरीता उच्च माध्यमिक परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती दिली जाणार आहे . तसेच गत 12 वर्षानंतर प्रथमच या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे . तसेच प्रवेश शुल्क , नोंदणी शुल्क , ग्रंथालय , नियतकालिका , वैद्यकीय तपासणी करीता शुल्क दिली जाणार आहे .

06.महसुल विभाग : नाचणे , जिल्हा रत्नागिरी येथे केंद्रीय विद्यालयाला जमीन देण्यास परवानगी देण्यात आली आहे , यामुळे या ठिकाणी नविन केंद्रीय विद्यालय उभारले जाणार आहे .

07.आश्वासित प्रगती योजना : आदिवासी विकास विभाग अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या स्वयंसेवी संस्थाद्वारा अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 12 व 24 वर्षाची सुधारित आश्वासित प्रगती योजना लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

Leave a Comment