Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ State Government Group ‘D’ (Class IV) employees go on an indefinite strike starting April 21. ] : राज्य सरकारी गट ड ( चतुर्थ श्रेणी ) कर्मचारी दि.21 एप्रिल पासुन बेमुदत संपावर जाणार आहेत . या संदर्भात राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ मार्फत प्रसिद्धी पत्रक सादर करण्यात आले आहेत .
सदर प्रसिद्धीपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य सरकारी गट ड कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या जिव्हाळ्याच्या रास्त मागण्यांकडे शासनांचे दुर्लक्ष होत असल्यामुळै सरकारी , निमसरकारी , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती …
महाराष्ट्र यांच्या माध्यमातुन दि.21.04.2026 पासुन पुकारलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामध्ये राज्यातील सर्व राज्य कर्मचारी सहभागी होणार असल्याची सुचना सदर प्रसिद्धीपत्रकानुसार देण्यात येत आहेत .
प्रमुख मागणी : आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत वर्ग – 4 कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतन निश्चितीमधील वेतनत्रुटी प्रस्ताव मा.बक्षी समितीस वेळेत सादर न झाल्याने मा.उच्च न्यायालय कोल्हापुर सर्कीट बॅच यांनी दि.03.12.2025 रोजी ..
आदिवासी खात्यातील वर्ग 04 कर्मचाऱ्यांवर वेतनत्रुटीबाबत झालेल्या अन्याय दुर होण्यासाठी शासनाने वर्ग 04 कर्मचाऱ्यांची सुनावणी घेवून त्यांच्या वेतनत्रुटीबाबतचा प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
तसेच दुसरी मागणी म्हणजे आदिवासी खात्यातील शिपाई व कामाठी यांना बहुउद्देशिय कर्मचारी संबोधण्यात येत असून ते स्वच्छता विषयक संबंधित कामे करीता असल्यामुळे त्यांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईगारांच्या वारसांना शासनसेवेत नोकरीत घेण्याची वारसाहक्क योजना लागु करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत .

- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !