राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे / वाहन भत्ता मध्ये कधी वाढ होणार ? जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ When will the house rent/vehicle allowance of state employees be increased? ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता , वाहन भत्ता मध्ये कधी वाढ होणार याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहुयात .

घरभाडे भत्ता : महागाई भत्ता 25 टक्के पार झाल्यानंतर घरभाडे भत्ता मध्ये वाढ करण्यात आलेली होती , तसेच डी.ए चे दर 50 टक्के पार झाल्यानंतर नुकतेच घरभाडे भत्ताचे दर 10 टक्के , 20 टक्के व 30 टक्के असे करण्यात आले आहेत .

सातवा वेतन आयोगानुसार विचार केला असता , घरभाडे भत्ताचे दर हे महागाई भत्ताचे दर 75 टक्केचा आकडा पार केल्यानंतर सुधारित करण्यात येईल . परंतु दि.01.01.2026 पासुन आठवा वेतन आयोग लागु करण्यात येणार असल्याने , घरभाडे भत्ताचे दर देखिल सुधारित करण्यात येईल , व सुधारित दराने घरभाडे भत्ता मिळेल .

वाहन भत्ता : एप्रिल 2022 पासुन वाहन भत्ताचे दर सुधारित करण्यात आले आहेत . यानुसार आता इराण युद्धामुळे इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत , यामुळे वाहन भत्ता दरांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली जाते आहे .

सध्या वेतनश्रेणीनुसार वाहन भत्ता मिळतो , यांमध्ये वाहन भत्ता 675 , 1350 , 2700  व 5400 वेतनश्रेणीनुसार भिन्न आहे . सध्या इंधनाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने , वाहन भत्ता मध्ये वाढ करावी अशी मागणी होत आहे .

Leave a Comment