राज्य कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली संदर्भात मोठा कॅबिनेट निर्णय दि.26.05.2026

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Major Cabinet decision regarding general transfer of state employees dated 26.05.2026 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली संदर्भात मोठा कॅबिनेट निर्णय घेण्यात आला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे ‍कि , देशात सुरु असलेल्या जनगणना 2027 च्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे .

त्यानुसार आता सरकारला 30 जुन 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबविता येणार असून , मुदतवाढीबाबतचा अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने जाहीर करण्यासही मंजूरी देण्यात आली आहे .

तसेच याकरीता महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणा करण्यात येणार असून , त्या संदर्भातील मसुद्यासही मंजूरी देण्यात येत आहे .

जनगणनेच्या कामाकरीता नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करु नयेत या केंद्र सरकारच्या दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे .

Leave a Comment