Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ new pay commission update news ] : आठवा वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे . या संदर्भातील सविस्तर आकडेवारी खालील प्रमाणे जाणून घेऊयात .
नुकतेच आठवा वेतन आयोग संदर्भात झालेल्या बैठकीत आठवा वेतन आयोग प्रत्यक्ष लागू करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे . आठवा वेतन आयोगास 18 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे . म्हणजेच माहे मे / जून 2027 पर्यंत कामकाज करण्यास मुदत आहे .
परंतु त्यानंतर सदर आठवा वेतन आयोग समितीने सादर केलेल्या अहवालाची पडताळणी, मंजुरी पर्यंत नोव्हेंबर 2027 पर्यंतचा कालावधी निघून जाणार आहे . यामुळे आठवा वेतन आयोग विलंबाने लागू होईल .
आठवा वेतन आयोग दिनांक 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जाणार असल्याने , यामध्ये मूळ वेतन , महागाई भत्ता थकबाकी दिली जाणार आहे .
HRA / TA भत्ते : परंतु HRA , वाहन भत्ता हे भत्ते पूर्वलक्षी प्रभावाने दिले जात नसल्याने , सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे . हा नुकसान प्रामुख्याने आठवा वेतन आयोग विलंबाने लागू होत असल्याने होणार आहे .
याशिवाय इतर देय भत्ते जसे प्रोत्साहन भत्ता , गणवेश भत्ता , धुलाई भत्ता अशा प्रकारचे भत्ते पूर्वलक्षी प्रभावाने दिले जात नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान होणार आहे .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026